Maharashtra Police Bharti 2019 | STARNaukri.Com

All Updates about Maharashtra Police Bharti 2019 keep visiting STARNaukri.Com. Maharashtra state will start police recruitment in 2019.

महाराष्ट्र पोलिस भर्ती 2019

पोलीस भरती प्रक्रियेत नोटा बदल: शारीरिक परिक्षेमधून महत्वाच्या चाचण्या रद्द. 

२०१९ महाराष्ट्र शासनाची पोलीस भरती सध्या खाशी चर्चेत आहे. १०० – १५० पदांसाठी नाही तर तब्बल सात हजार जागांसाठी ही मेगा भरती ठरली आहे. म्हणजेच सात हजार नवीन नियुक्त्या होणार आहेत. अर्थातच ह्यामुळे हजारोंच्या संख्येत रोजगार उपलब्ध होणार आहे. पण मात्र ‘पोलीस’ खात्यात भरती होणे कधीच सोपे नव्हते. लेखी परीक्षा आणि वेगवेगळ्या शारिरीक चाचण्या ह्यातून उत्सुक उमेदवाराला जावंच लागतं. ह्या चाचण्यांमध्ये खास करून शारीरिक तंदुरुस्ती दर्शविणाऱ्या चाचण्यांमधून फेल झाल्यास उमेदवाराला पुन्हा तंदुरुस्त होऊन नंतर प्रयत्न करावा लागतो. सहजासहजी पोलीस भरती केवळ अशक्य.

पण आत्ताच ह्या महाभरतीच्या तोंडावर मात्र पोलीस उमेदवारीच्या काही परीक्षा रद्द केल्याची बातमी समोर येत आहे. २०१२ च्या पोलीस शिपाई सेवा प्रवाह नियमावलीत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ह्या मध्ये सुरुवातीला होणारी लेखी परीक्षा आणि त्याची पद्धती सारखीच असणार आहे. १०० गुणांची ही लेखी परीक्षा ९० मिनिटात पूर्ण करायची असणार आहे. ह्यात कोणताच बदल केलेला दिसून येत नाही. शारीरिक तंदुरुस्ती चाचणी ह्यातील काही व्यायामप्रकार मात्र रद्द करण्यात आला आहे.

१०० गुणांची शारीरिक चाचणी पूर्वी घेतली जायची ती आता अवघ्या ५० गुणांची असणार आहे. ह्या मध्ये ५० गुणांची असणारे ‘लांब उडी’ आणि ‘पुलं अप्स’ हे दोन्ही व्यायामप्रकार काढून टाकण्यात आले आहेत. आता उर्वरित ५० गुणांसाठी फक्त खालील ३ प्रकारच्या चाचण्या घेण्यात येतील.

पुरुष उमेदवार:

१. धावणे – १६०० मीटर – ३० गुण

२. धावणे – १०० मीटर – १० गुण

३. गोळाफेक – १० गुण

महिला उमेदवार:

१. धावणे – ८०० मीटर – ३० गुण

२. धावणे – १०० मीटर – १० गुण

३. गोळाफेक – (४.५किलो) १० गुण

तर १०० मार्कंच्या लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३५ टक्के, आणि इतर मागास वर्गीयांना ३३ टक्के गन मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेतून एका उमेदवारीसाठी ५ जणांची निवड होईल. त्यांनतर सगळ्या शारीरिक चाचण्यातून अव्वल येणाऱ्यांची त्या पदावर नियुक्ती होईल.

शारीरिक चाचणीतून २ व्यायामप्रकार काढले असले तरी लेखी परीक्षेतील ४ विषय तसेच राहतील. ह्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण ह्या विषयातील प्रश्न असतील.

महाराष्ट्र सरकार मधील मेगा भरतीमधील ७००० जागा पोलीस खात्याला मिळाल्या आहेत. आणि त्यासाठी लवकरच वर सांगितल्या प्रमाणे परीक्षा होतील. कसून सर्व करणाऱ्या सर्व उमेदवारांनी ह्या बदलांची नोंद घ्यावी ह्यासाठी सरकार तर्फे पत्रकही जाहीर करण्यात आहे आहे. आता पोलीस भरती पूर्वी इतकी महाकठीण राहिली नाही त्यामुळे उमेदवारांना दिलासा नक्कीच मिळेल..!!


English

Maharashtra Police Bharti 2019

The Police Bharti is Expected to start From Jan 2019, but it’s not an official News. And very Soon the Official Updates about Police Bharti 2019 will be available Soon. So Form All Updates about Maharashtra Police Bharti 2019 keep visiting STARNaukri.Com. Maharashtra state will start police recruitment in 2019. The Written Examinations will be carried first, While the Physical Examination will be carried later on. After the submission of application form, Written Examination will be schedule For 100 Marks.

Male candidates:

1. Running – 1600 meters – 30 points

2. Running – 100 meters – 10 points

3. Pickling – 10 points

Female candidates:

1. Running – 800 meters – 30 points

2. Running – 100 meters – 10 points

3. Chalking – (4.5 kg) 10 points

Team – STAR Naukri wishing you all the best. For further information like Call letter/Hall ticket, Timetable, Syllabus stay tuned with us.